बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मार्च 2020 (12:12 IST)

येस बँकेतून पाच लाखांची रक्कम काढता येणार

येस बँकेच्या खातेदारांसाठी खुशखबर आहे. आरबीआयच्या निर्बंधानंतर बँकेच्या ग्राहकांना केवळ ५० हजार रुपये काढण्याची मुभा होती. मात्र, बँकेतून आता अधिकची रक्कम काढण्याची सवलत मिळणार आहे. याचा बँक खातेदारांना फायदा होणार आहे. आता  बँकेतून पाच लाखांची रक्कम काढता येणार आहे. अटीशर्थींसह पैसे काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 
येस बँकेवर RBI ने निर्बंध आणल्यानंतर, बँकेच्या खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता बँकेने आजपासून गरजेचे असल्यास, पाच लाखांची रक्कम बँकेतून काढता येणार आहे. 
 
खातेधारकांना याबाबत बँकेला पत्र देऊनच पैसे काढण्याची अट घालण्यात आली आहे. यात, वैद्यकीय उपचारांसाठी, शिक्षणासाठी, लग्नासाठी खातेदार ही रक्कम काढू शकतील.