बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (07:56 IST)

एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 20.39 टक्के सक्रिय कोरोना रूग्ण

देशात कोरोनाची लाट हळूहळू ओसरत आहे. एकूण सक्रिय कोरोनारूग्णांची संख्या 3 लाख 5 हजार 344 (3.04 टक्के) वर पोहचली आहे. 10 राज्ये, केंद्रशासित प्रदेशात एकूण सक्रिय रूग्णसंख्येपैकी 66 टक्के रूग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 20.39 टक्के सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत. 
 
महाराष्ट्रापाठोपाठ केरळ (19.84 टक्के), प. बंगाल (6.05 टक्के), उत्तर प्रदेश (5.76 टक्के), छत्तीसगड (5.58 टक्के), कर्नाटक (4.71 टक्के) तसेच राजस्थानमध्ये (4.19 टक्के) सक्रिय कोरोनारूग्ण आहेत. या राज्यांव्यतिरिक्त उर्वरित देशात 33.48 टक्के सक्रिय कोरोनारूग्ण उपचार घेत असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
 
शनिवारी दिवसभरात 26 हजार 624 बाधित आढळले. तर 341 मृत्यू झाले.दिलासादायक बाब म्हणजे 29 हजार 690 रूग्णांनी कोरोनावर मात केली. देशातील एकूण कोरोनारूग्णांची संख्या त्यामुळे 1 कोटी 31 हजार 223 झाली असली, तरी यातील 95 लाख 80 हजार 402 रूग्ण कोरोनातून पुर्णत: बरे झाले आहेत. तर, 1 लाख 45 हजार 477 रूग्णांचा (1.45 टक्के) कोरोनाने बळी घेतला. रविवारी देशाचा कोरोनामुक्तीदर 95.51 टक्के नोंदवण्यात आला.