रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 4 जून 2022 (12:56 IST)

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती!

कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने राज्यात आता पुन्ही मास्क सक्ती करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने एक पत्र जारी केलं असून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती असणार आहे.
 
राज्यात कोरोनाची आकडेवारीत दैनंदिन वाढत असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मास्क सक्ती करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता आता राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मास्क सक्तीच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.