शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 1 जून 2020 (16:14 IST)

केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार

करोना व्हायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी पुढच्या काही दिवसात केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार आहेत. करोना रुग्णांवर उपचार करताना मुंबईला आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. केरळहून १६ डॉक्टरांची टीम मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे असे डॉक्टर संतोष कुमार यांनी सांगितले.तिरुअनंतपूरममधल्या सरकारी मेडिकल कॉलेजचे ते उपअधीक्षक आहेत. 
 
पुढच्या काही दिवसात केरळहून ५० डॉक्टर आणि १०० नर्सेस मुंबईत येतील असे कुमार यांनी सांगितले. “सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर काम करतील. ते वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित रुग्णालय आहे. मुंबईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी येणारे डॉक्टर केरळात खासगी क्षेत्रामध्ये काम करतात. स्वच्छेने ते आपल्याच सहकाऱ्यांची मदत करण्यासाठी येत आहेत” असे डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले.