Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा
दक्षिण-पश्चिम मान्सूनने सोमवारी केरळमध्ये जोरदार दणका दिला. कोझीकोड जिल्ह्यात आज सकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी भारत हवामान खात्याने ही माहिती दिली. केरळमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, आलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.
यापूर्वी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या अंदाजानुसार केरळमध्ये यंदा उशिरा पावसाळा येईल, असे सांगितले होते. आयएमडीने म्हटले आहे की यावर्षी केरळमध्ये मान्सून 5 जूनपर्यंत येऊ शकेल.Indian Meteorological Department has issued a yellow alert for nine districts of Kerala today - Thiruvananthapuram, Kollam, Pathanamthitta, Alappuzha, Kottayam, Ernakulam, Idukki, Malappuram and Kannur districts. https://t.co/C4LfSx4irs
— ANI (@ANI) June 1, 2020
महत्त्वाचे म्हणजे की जून ते सप्टेंबर या चार महिन्यांपर्यंत मान्सूनच्या हंगामात 75 टक्के पाऊस पडतो.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला. सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे हळू आहे. 3-4 तारखेच्या दरम्यान पावसामुळे दादरा नगर हवेली, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दमण दीव येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात, लोकांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल.
