राज्यात 57 हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण, 222 जणांचा मृत्यू

mask
Last Modified सोमवार, 5 एप्रिल 2021 (09:11 IST)
राज्यात कोरोना रुग्णसंख्येने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वेगाने वाढत आहे. रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. दिवसभरात राज्यात तब्बल 57 हजार 074 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 222 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

राज्यात 222 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.86 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 55 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज रोजी राज्यात 4 लाख 30 हजार 503 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात पुण्यामध्ये सर्वाधिक 81 हजार 317 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येत वाढ होत आहे. 27 हजार 508 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 25 लाख 22 हजार 823 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 83.8 टक्के एवढा झाला. आहे. मागील काही दिवसांपासून रिकव्हरी रेट वेगाने घटत आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 05 लाख 40 हजार 111 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30 लाख 10 हजार 597 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.66 टक्के आहे. सध्या राज्यात 22 लाख 05 हजार 899 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 19 हजार 711 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 81317, मुंबई 66803, ठाणे 53230, नाशिक 31737, औरंगाबाद 16054, नांदेड 11079, नागपूर 53638, जळगाव 8421, अहमदनगर 14293 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

अमित शाह-उद्धव ठाकरेंचं एकत्रित भोजन, दोघांमधील स्वतंत्र ...

अमित शाह-उद्धव ठाकरेंचं एकत्रित भोजन, दोघांमधील स्वतंत्र बैठकीची चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (26 ...

UNGA मध्ये इम्रान खान ने काश्मीरवर बोललेल्या खोटं ...

UNGA मध्ये इम्रान खान ने काश्मीरवर बोललेल्या खोटं साठी,भारताच्या स्नेहाचे सडेतोड उत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उठवला काश्मीरचे ...

IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल ...

IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानी पोहोचली
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 35 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव ...

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीचा खून,प्रेयसीशी सूड ...

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीचा खून,प्रेयसीशी सूड घेण्यासाठी निर्घृणपणे ठार मारले
असे म्हणतात,मुली आपल्या वडिलांच्या काळीजाचा एक भाग असतो.मुलींसाठी वडील काहीही करायला ...

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे ...

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं
18 फेब्रुवारी 2019...भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख ...