गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (10:21 IST)

पुण्यात कोरोना स्फोट !रुग्णांची संख्या एकाच दिवसात 10,000 पार !

सध्या कोरोनाने सर्वत्र उच्छाद मांडले आहे. गेल्यावर्षी पुणे  कोरोनाचा  हॉटस्पॉट होता. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोविड सेंटर बंद करण्यात आले. यंदाच्या वर्षी पुन्हा कोरोना च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून एका दिवसातच कोरोनाचे तब्बल 10 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 10 हजाराहून अधिक झाली असून पुणे शहरात 5 हजार हुन अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात रुग्णांची संख्या 1500 झाली आहे तर 66 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत. सध्या पुण्यात कोरोनाचा हा समूह संसर्ग असल्याची शक्यता वर्तली जात आहे. सध्या पुण्यात 12 तासाची संचार बंदी लावण्यात आली आहे.