मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (18:24 IST)

CoronaVirus Updates : पुण्यात 64 हजार अॅक्टिव केस

पुण्यात बुधवारी संसर्गाचे 8 हजार 553 नवीन प्रकरणं समोर आली आहे. सध्या येथे सक्रिय रुग्णांची संख्या 64 हजार याहून ‍अधिक आहे. महाराष्ट्राच्या नंदुरबार येथे 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. दरम्यान आवश्यक सेवा प्रतिबंधित नसरणार. सर्व गैर आवश्यक सेवा जसं स्थानिक बाजार, सिनेमा हॉल, मॉल, धार्मिक स्थळ बंद राहतील. मागील काही दिवसांपासून येथे 400 हून अधिक केसेस येत आहे.
 
दुसरी बाजुला करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली असून केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण खुलं केलं आहे. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही लसीकरण केंद्रावर जाऊन पहिला डोस घेतला. तसंच पुणेकरांनाही लस घेण्याचं आवाहन केलं. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुड येथील महापालिकेच्या सुतार दवाखाना येथे लस घेतली.