शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (08:22 IST)

राज्यात ७५ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

राज्यात मंगळवारी कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.  १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ६६ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ७४ हजार ७६१ नमुने पॉझिटिव्ह (१८.७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाईन आहेत. सध्या ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के एवढा आहे.
 
मागील ४८ तासात झालेले ९५ मृत्यू हे मुंबई मनपा-३६, ठाणे-३, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा- ४, भिवंडी निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-२, नाशिक-२, नाशिक मनपा-१, जळगाव-५, पुणे-१, पुणे मनपा-५, पिंपरी चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-२, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-११, लातूर-१,अकोला-२, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.