1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (08:15 IST)

कोणत्या झोन मध्ये कोणती सुविधा सुरू राहणार

new guidelines
देशातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढविण्यात आले आहे. 1 मे रोजी गृहमंत्रालयाने लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. नव्या आदेशानुसार लॉकडाऊन पुढील दोन आठवड्यांपर्यंत असणार असून 4 मे पासून मुदतवाढ देण्यात आली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन वाढवून 3 मे पर्यंत वाढविला होता. गृह मंत्रालयानेही आपल्या आदेशात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
 
रेड झोनमध्ये रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब, बसेस, न्हावी, स्पा आणि सलून, दोन जिल्ह्यांमध्ये होणारी बस वाहतूक हे बंद राहतील.
 
रेड झोनमध्ये मोठ्या प्रमाणात इतर उपक्रम सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मनरेगाची कामे, फळांवर प्रक्रिया करणारे युनिट्स आणि वीट भट्ट्यासंह ग्रामीण भागातील सर्व औद्योगीक आणि बांधकाम सुरु ठेवण्यास परवानगी.
 
प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आयटी सेवा, माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा, कॉल सेंटर, शीतगृह गोदाम, खासगी सुरक्षा सेवा सुरु राहणार आहेत.
 
रेड झोनमध्ये ज्या उपक्रमांना परवानगी आहे त्या व्यतिरिक्त टॅक्सी आणि कॅबला परवानगी दिली जाईल. टॅक्सीमध्ये 1 ड्रायव्हर आणि 1 प्रवासी असेल.

ऑरेंज   झोन
जिल्ह्यातील लोक आणि वाहनांना चालवण्याची परवानगी असेल. तसेच ज्या कामांना मान्यता दिली आहे अशी कामे सुरु राहतील. चारचाकी वाहनात ड्रायव्हरशिवाय जास्तीत जास्त दोन लोंकाना बसण्याची परवानगी. दुचाकीवर दोन लोकांना जाण्याची परवानगी दिली जाईल.
 
ग्रीन झोन
ऑरेंज आणि रेड झोनमध्ये परवानगी असलेल्यांना उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच दारू आणि पान दुकानांना देखील परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांमध्ये दोन व्यक्तींमधील अंतर 6 फूटांचे असले पाहिजे आणि दुकानात एकावेळी 5 पेक्षा अधिक लोकं नसावीत.