बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शुक्रवार, 14 मे 2021 (18:16 IST)

बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही -सीबीएसई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शुक्रवारी सांगितले की बारावी बोर्डाच्या प्रलंबित परीक्षेबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.कोविड -19 च्या साथीची सद्यस्थिती पाहता ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांच्या एका वर्गा कडून केली जात आहे.
सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, 12 वी बोर्डाच्या परीक्षेबाबत असा कोणताही निर्णय (रद्दकरण्याबाबत) घेतला गेला नसल्याचे स्पष्ट केले जात आहे.या संदर्भात कोणताही निर्णय घेतल्यास अधिकृतपणे कळविण्यात येईल, असे ते म्हणाले.
बारावी बोर्ड परीक्षा घेण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता विचारत या प्रश्नावर अधिकारी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. मात्र, कोविड -19 साथीच्या आजारामुळे विद्यार्थी व पालक यांच्यातील काही वर्ग ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत आहेत.
उल्लेखनीय आहे की कोविड -19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर मंडळाने 14 एप्रिल रोजी दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचीआणि बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बोर्डाच्या परीक्षा साधारणत: दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात .परंतु यंदाच्या वर्षी मे पासून हा कार्यक्रम सुरू होणार होता.
मंडळाने असे म्हटले होते की 12 वीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 1 जूननंतर त्याचा आढावा घेण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत किमान 15 दिवस अगोदर नोटीस दिली जाईल.
सीबीएसईने या महिन्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात गुण देण्याची नीती जाहीर केली. या अंतर्गत, विषयांच्या आधारे प्रत्येक विषयातील 20 गुण व वर्षाच्या घेण्यात आलेल्या विविध चाचण्या किंवा परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर 80 गुण दिले जातील.