शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (07:49 IST)

राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गुरुवारी ४२ हजार ५८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान ८५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे.
 
सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. राज्यात ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख ५४ हजार ७३१ इतकी झाली आहे. परंतु आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ३३ हजार २९४ वर पोहोचली आहे.
 
महाराष्ट्रात एकुण आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०३,५१,३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,६९,२९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,०२,६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज होम क्वारंटाईन रुग्णसंख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले.
 
नोंद झालेल्या एकूण ८५० मृत्यूंपैकी ४०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८१ मृत्यू, ठाणे- ५६, पुणे- ४०, नागपूर- २९, बीड- २०, गडचिरोली- १९, रत्नागिरी- १६, नंदूरबार- १५, सोलापूर- १५, जळगाव- १४, बुलढाणा- ११, नाशिक- ८, औरंगाबाद- ५, चंद्रपूर- ४, जालना- ४, रायगड- ४, सातारा- ४, सांगली- ३, वाशिम- ३, भंडारा- २, लातूर- २, नांदेड- २, उस्मानाबाद- २, धुळे- १, परभणी- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत.