शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (18:25 IST)

Special Story : Corona काळात तणावातून मुक्त कसे व्हावे, मानसोपचार तज्ञाकडून जाणून घ्या

कोरोनाव्हायरस (Coronavirus) च्या या काळात साथीच्या आजारामुळे शारीरिक समस्यांसह अनेक लोक मानसिक आजराला सामोरा जात आहे. एका अंदाजानुसार 70 टक्के लोक सध्या मानसिक ताणतणावात आहेत. ज्यात काळजी (Anxiety), औदासिन्य (Depression) निद्रानाश (Insomnia) सारख्या समस्या प्रामुख्याने बघायला मिळत आहे.
 
गेल्या वर्षांमध्ये इंडियन स्केट्री सोसायटीच्या सर्वेक्षणात सांगितले गेले की कोरोना साथीच्या आजारामुळे मानसिक आजारामुळे 20 टक्क्यापर्यंत अधिक लोक ग्रस्त झाले आहेत. यासाठी अर्थव्यवस्था ते इतर कारणं देखील कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. वाढत असलेल्या कोरोना काळमुळे निश्चितच हे आकडे वाढले आहेत. यासह लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत.
 
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आणि मालवांचल विद्यापीठाचे कुलपति डॉ. रामगुलाम राजदान यांनी वेबदुनियाशी चर्चा करताना सांगितले की आत्ता 70 टक्के लोक मानसिक तणावाचे शिकार आहेत. यात चिंता, नैराश्य, उदासीनता, ‍चिडचिड़, अवसाद, अनिद्रा सारखष लक्षणं समोर येत आहे. या सर्व गोष्टी कोरोनाव्हायरस युगात अधिक पाहिल्या गेल्या आहेत.
 
कारण काय आहे : डॉ. राजदान म्हणतात की लोकांमध्ये विचित्र भीती आहे, भविष्याप्रती चिंता (रोजगार, मुलांचे शिक्षण, आरोग्य इतर), संसर्गाची भीती, संक्रमणानंतर सामाजिक अंतर, कोरोना संक्रमणामुळे मृत्यूचा भय, परिचित लोकांचा मृत्यू, चारीबाजूला तणावपूर्ण वातावरणाचा प्रभाव, नकारात्मक वातावरण, सतत नकारात्मक बातम्या, रोजगाराची काळजी, सामान्य सर्दी आणि गळा खवखवणे आणि त्यामुळे कोरोनाची भीती, वाईट आर्थिक परिस्थिती इतर कारणं आहेत, ज्यामुळे लोकांचा ताण वाढत आहे.
 
काय करावे : डॉ. राजदान म्हणतात की या समस्यांना घाबरण्याऐवजी आपण त्यांचा सामना केला पाहिजे. कारण भीतीपुढे विजय आहे. ते म्हणातत की ताण कमी करण्यासाठी लहान उपाय नक्कीच कार्य करू शकतात. ते म्हणतात की प्रथमच दररोज आपल्यासाठी एक तास काढा. या दरम्यान पेंटिंग, सिंगिंग इतर आपले जे काही छंद असतील ते जोपसण्याचा प्रयत्न करा. संगीताची आवड असेल तर म्युझिक ऐका. पौष्टिक आहार घ्या आणि सोबतच 6-7 तासाची पुरेशी झोप घ्या. समस्या अधिक जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ध्यान आणि योग : डॉ. राजदान म्हणतात की योग आणि ध्यान केल्याने ताणतणाव दूर होण्यास खूप मदत होते. अनुलोम-विलोम, कपालभाति, नाद योग इतर प्राणायाम करावे. ब्रीदिंग एक्सरसाइज करावी. याने आपली श्वसन प्रणाली बळकट होईल. कोरोना सर्वात अधिक श्वसन प्रणालीवर परिणाम करतं.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवा. स्वत:ला हेल्पलेस जाणवू देऊ नका. फोनवरच का नसो पर सामाजिक राहा, दररोज आपल्या नातेवाईक आणि मित्रांशी फोनवर बोलून मन मोकळं करा. जवळच्या नातेवाईकांशी संपर्कात रहा जेणेकरून त्यांना आवश्यकता पडल्यास त्यांची मदत घेऊ शकता किंवा स्वत: मदतीसाठी तयार राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण करणे आवश्यक आहे.