सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शनिवार, 2 जुलै 2022 (15:54 IST)

विश्रामासन योगाचे 5 फायदे जाणून घ्या आणि ताण दूर करा

yoga
हे आसन केल्यानं एखादा व्यक्ती स्वतःला पूर्ण विश्रामाच्या स्थितीत अनुभवतो म्हणून याला विश्रामासन म्हणतात. याचे दुसरे नाव बालासन देखील आहे. हे तीन प्रकारे केले जाते. पोटावर झोपून, पाठीवर झोपून आणि वज्रासनात बसून. इथे आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत पोटावर झोपून केला जाणारा विश्रामासन. हे काही सें मकरासन सारखे आहे.
 
विधी - पोटावर झोपून डावा हात डोक्याच्या खाली जमिनीवर ठेवा मानेला उजवी कडे फिरवा डोक्याला हातावर ठेवा, डावा हात डोक्याच्या खाली ठेवा डाव्या हाताची तळ उजव्या हाताच्या खाली असेल. डाव्या पायाचे गुडघे वाकवून लहान मुलं झोपतो तसे झोपा अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने देखील करा.
 
खबरदारी - 
डोळे बंद करा. हाताला डोक्याच्या खाली सुविधेनुसार ठेवा आणि शरीर सैलसर ठेवा. श्वास घेण्याच्या स्थितीत देखील शरीरास हालवू नका. दीर्घ आणि आरामशीर श्वास घ्यावे.
 
फायदे - 
1 श्वास घेण्याच्या स्थितीत आपले मन शरीराने जोडलेले असते. या मुळे आपल्या शरीरात कोणतेही बाहेरचे विचार येत नाही. मन शांत आणि आरामदायी स्थितीत असतं. तेव्हा शरीर स्वतःच शांती अनुभवतो.
2 सर्व अंतर्गत अवयव तणाव मुक्त होतात, ज्यामुळे रक्त विसरणं सुरळीत सुरू होतं. आणि ज्या वेळी रक्त विसरणं व्यवस्थित सुरू असतं शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो.
3 ज्या लोकांना उच्च रक्तदाब आणि निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांना या बालासना पासून फायदा होतो.
4 पचन तंत्र सुरळीत ठेवते आणि अन्न पचण्यास मदत करते.
5 हे शरीरातील सर्व वेदना दूर करते.