बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : मंगळवार, 11 मे 2021 (18:29 IST)

म्युकोरमाइकोसिसची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही.तर आणखी एक नवीन आजार जन्माला येत आहे, कोविड मधून बरे झालेले रुग्ण रुग्णालयातून घरी गेल्यावर एक नवीन आजार उद्भवत आहे या आजाराबद्दल कुटूंबाला किंवा रुग्णांना माहिती नाही. हा जीवघेणा आजार म्युकोरमायकोसिस हळूहळू देशात पसरत आहे. म्युकोरमायकोसिसशी संबंधित बरेच प्रश्न रुग्णांच्या मनात उद्भवले आहेत. परंतु सर्व प्रथम, म्युकोर  मायकोसिस म्हणजे काय आहे हे जाणून घेऊ या.
म्युकोर मायकोसिसला ब्लॅक फंगस इन्फेक्शन म्हणून देखील ओळखले जाते. पोस्ट कोविड -19 झालेल्या नंतरच्या रुग्णांमध्ये हा आजार सर्वात सामान्य आढळत आहे. हा फंगस संसर्ग नाकातून सुरु होऊन, नंतर तोंडात, नंतर डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि मग मेंदू पर्यन्त जातो. योग्य वेळी लक्षणे ओळखून या वर उपचार देखील शक्य आहेत. तथापि, हा संसर्ग मधुमेहाच्या रूग्णांवर सर्वात जास्त परिणाम करीत आहे. चला म्युकोर मायकोसिसशी संबंधित काही माहिती जाणून घेऊ या.
 
या 6 लोकांमध्ये म्युकोर मायकोसिस रोगाचा धोका जास्त आहे -
 
1 मधुमेहांच्या रूग्णांमध्ये
2 जे रुग्ण स्टिरॉइड्स जास्त प्रमाणात घेत आहे.
3 आयसीयूमध्ये राहणाऱ्या रूग्णांमध्ये.
4 गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये.
5  पोस्ट ट्रान्सप्लांट आणि मैलिग्नेन्सी असलेल्या लोकांमध्ये
6 व्होरिकोनाझोल थेरपी घेत असलेल्या लोकांमध्ये.
 
म्युकोर माइकोसिसची लक्षणे -
 
1 सायनसचा त्रास होणं, नाक चोंदणे, नाकाच्या हाडात वेदना होणं.
2 नाकातून काळा द्रव्य किंवा रक्तस्त्राव होणं.
3 डोळ्यात सूज येणं,अंधुक दिसणे.
4 छातीत दुखणे,
5 श्वास घ्यायला त्रास होणं.
6 ताप येणं.
 
ब्लॅक फंगस संसर्ग टाळण्यासाठी काय करावे-
 
1 कोविड मधून बरे झाल्यावर आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासा.
2 डॉ.च्या सल्ल्यानुसारच स्टिरॉइडचा वापर करा.त्यांच्या सल्ल्यानुसारच डोस कमी-जास्त करा.
3  डॉ.च्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल औषधे वापरा
4 ह्युमिडिफायरमध्ये स्वच्छ पाणी वापरा.
5. हायपरग्लाइसीमिया नियंत्रित ठेवा.
 
आयसीएमआरने ब्लॅक फंगस चे संक्रमण रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. चला काय ते जाणून घेऊया -
 
1 मधुमेह रूग्णांनी आपली साखर नियंत्रित केली पाहिजे.
2 डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टिरॉइडचा वापर कमी करा.
3 रोग प्रतिकारशक्ती बूस्टर औषधे बंद करा.
4 अँटीफंगल प्रोफिलॅक्सिसची आवश्यकता नसल्यास घेऊ नका.
 
ब्लॅक फंगस संसर्गाचा कसा उपचार केला जाऊ शकतो-
 
1 शरीराला हायड्रेट होऊ देऊ नका, म्हणजेच पाण्याची कमतरता होऊ देऊ नका .
2  4 ते 6 आठवडे अँटीफंगल थेरपी घेऊ शकतात.
3 सेंट्रल कॅथेटरची मदत घ्या.
4 रेडिओ इमेजिंग तंत्राने निरीक्षण करा.
 
* ब्लॅक फंगस संसर्गापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या.
* नेहमीच मास्क घाला.
* आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
 
आजकाल कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत आहे. सीडीसीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार हा विषाणू 6 फूट अंतरावरही पसरू शकतो. या प्राणघातक विषाणू मुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वेगाने वाढू लागते. या मुळे चेहरा सुन्न होणे, दातदुखी, सूज येणे, दातपडणे, घसा दुखणे सारखे  लक्षणे आढळल्यास अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.ही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉ.शी संपर्क साधावा.