गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (09:36 IST)

या 25 देशांमध्ये पसरला ओमिक्रॉन

कॅलिफोर्नियात पहिला रुग्ण आढळला
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका व्यक्तीला या नवीन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, अमेरिकेत कोविड-19 च्या ओमिक्रॉनची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. संक्रमित व्यक्ती 22 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतला होता आणि 29 नोव्हेंबर रोजी त्याला संसर्ग झाल्याचे आढळले. त्या व्यक्तीला लस देण्यात आली होती परंतु लसीचा बूस्टर डोस मिळाला नव्हता. व्यक्तीमध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणे आढळून आली असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
 
दक्षिण आफ्रिकेतील देशांवर प्रवास बंदी
गेल्या महिन्याच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी दक्षिण आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घातली होती. येथेच कोविडचे नवीन रूप आढळून आले. आता हा नवीन व्हेरिएंट किमान 25 देशांमध्ये पसरला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे अध्यक्ष टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी यापूर्वीच हा नवीन व्हेरिएंट इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त केली होती.
 
या देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग
बोत्सवानामध्ये 19, दक्षिण आफ्रिकेत 77, नायजेरियामध्ये 3, यूकेमध्ये 22, दक्षिण कोरियामध्ये 5, ऑस्ट्रेलियामध्ये 7, ऑस्ट्रियामध्ये 1, बेल्जियममध्ये 1, ब्राझीलमध्ये 3, चेक रिपब्लिकमध्ये 1, फ्रान्समध्ये 1, जर्मनीमध्ये 9 , हाँगकाँगमध्ये 4, इस्रायलमध्ये 4, इटलीमध्ये 9, जपानमध्ये 2, नेदरलँडमध्ये 16, नॉर्वेमध्ये 2, स्पेनमध्ये 2, पोर्तुगालमध्ये 13, स्वीडनमध्ये 3, कॅनडात 6, डेन्मार्कमध्ये 4, यूएसए आणि 1 मध्ये UAE मध्ये देखील 1 प्रकरण समोर आले आहे.