गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (21:32 IST)

राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या 20 वर

जगभरामध्ये ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. भारतामध्येही आतापर्यंत या विषाणूचे 23 रुग्ण आढळून आले होते. त्यात आणखी दहा जणांची भर पडली आहे. चिंताजनक म्हणजे एकट्या महाराष्ट्रातच ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दहा रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दल माहिती दिली आहे.
“महाराष्ट्रात आज एकूण 10 ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सुमारे 65 स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी 3 लॅब आहेत. येत्या काळात नागपूर आणि औरंगाबादमध्ये आणखी लॅब उघडणार आहोत,” असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, आढळलेले रुग्ण हे राज्यातील कोणत्या शहरातील आहेत, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण होते.  राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या 20वर पोहोचली आहे