मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (13:08 IST)

पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्याला करोनाची लागण, मागील आठवड्यापर्यंत करत होता डिलिव्हरी

दिल्लीतील एका कंपनीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता त्याच्या संपर्कात आलेल्या 72 जणांना क्वारंटाइनमध्ये हलवलं आहे.
 
हा कर्मचारी मागील आठवड्यापर्यंत पिझ्झा डिलिव्हरी देत होता. मागील आठवड्यात तो डायलिसीस करण्यासाठी रुग्णालयात गेला होता. त्यावेळी तो करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनानं या व्यक्तीनं ज्या घरांमध्ये पिझ्झा डिलिव्हरी केली तसेच ज्यांच्या संपकार्त आला त्यांना तातडीनं क्वारंटाइन केलं. त्यांची चाचणी करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली आहे. मात्र, काही कालावधीनंतरही यांची लक्षणं दिसण्याची शक्यता असल्यानं त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
 
राजधानी दिल्ली देखील कोरोनाची संख्या वाढत असून स्थिती गंभीर आहे.