suvichar
✕

पुणे : हॉटस्पॉट्समधील सुमारे ५१.५ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज

Updated: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (08:45 IST)
 
पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आलेल्या भागांत हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात एकूण १६६४ रक्त चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ५१.५ टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडीज आढळल्या.
 
येरवडामध्ये ३६७ जणांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ५६.६ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. कसबा येथील सोमवार पेठ ३५२ पैकी ३६.१ टक्के, रास्ता पेठ येथील रविवार पेठमध्ये ३३५ पैकी ४५.७ टक्के, लोहियानागर येथील कासेवाडीमध्ये ३१२ पैकी ६५.७ टक्के, नवी पेठ येथील पर्वतीत २९८ पैकी ५६.७ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. एकूण १६६४ सॅम्पलपैकी ५१.५ टक्के बाधित कोरोना होऊन गेल्याचे समोर आलंय.
 
पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, आयसर चे संचालक प्रो. शशिधर यांनी ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे अँटिबॉडीज आढळलेल्या नागरिकांमध्ये कोरोनविरोधातील प्रतिकारशक्ती विकसित झालेली असते. मात्र अशा लोकांना पुन्हा कोरोना होणार नाही असं अजिबात नाही हेदेखील तज्ज्ञांनी स्पष्ट केलय.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Honda Rebel 500 च्या किमती जाहीर; ५,००० रुपयांत बुक करा ही शक्तिशाली क्रूझर

१३० किमी वेगाने धडकणार 'अकवान' चक्रीवादळ! महाराष्ट्रातील कोणत्या भागांना पावसाचा धोका?

राज्यपाल आज लातूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार?

दीपिका पदुकोणच्या 'लिव्ह लव्ह लाफ' फाउंडेशनमध्ये मोठी नियुक्ती; डॉ. इंदू भूषण यांची भूमिका काय?

Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर पुन्हा गडगडले! जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीचे भाव आले खाली

पुढील लेख
Show comments