बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (11:10 IST)

आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार

राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाची काळजी वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
 
राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.