बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2020 (12:11 IST)

Coronavirus हवेच्या माध्यमातूनही पसरतो ? WHO ने घेतली दखल

Coronavius हा Airborne विषाणू असल्याचे काही पुरावे संशोधकांनी सादर केले असून यासंबंधीचे काही नवीन पुरावे समोर येत असल्याच्या गोष्टीला जागतिक आरोग्य संघटनेनं दुजोरा दिला आहे.
 
आता हा विषाणू अधिक धोकादायक ठरणार का, याविषयी चर्चा सुरू आहे. आधी WHO ने हा दावा फेटाळला होता. मात्र आता हा हवेतून पसरणारा विषाणू असल्याचे काही पुरावे सादर झाले असल्याचं मान्य केलं. हा विषाणू हवेतून संसर्ग पसरवू शकतो, याविषयीचे काही पुरावे असतील, तर त्याची दखल घ्यायला आम्ही तयार आहोत, असं संघटने सांगितलं.
 
गर्दीच्या असलेल्या, बंदिस्त आणि कोंदट जागेच्या ठिकाणी हवेतून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
जगातल्या दोनशेहून अधिक शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला यासंदर्भात पत्र लिहून कोरोनाचा हवेतून प्रसार धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. या नव्या अभ्यासामुळे बाधित व्यक्तिंपासून किती दूर राहायचे काय काळजी घ्यायची याचे निकषही बदलण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
 
आतापर्यंत कोरोनाव्हायरस हा संक्रमित व्यक्ती शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबाशी इतर व्यक्तींचा संपर्क आला किंवा हे थेंब पडलेल्या पृष्ठभागाशी संपर्क आला तर कोरोनाव्हायरसची लागण होते, अशी समज आहे. मात्र एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितल्याने काळजी अधिकच वाढली आहे.
 
हवेतून कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे पुरावे सिद्ध झाले तर जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनासंदर्भातील निर्देशांमध्ये बदल होऊ शकतो.