Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासादायक : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्ण निदान कमी झाले

Updated: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:40 IST)
 
राज्यात सोमवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून  ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते.  सकारात्मक बाब म्हणजे राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी, २९ नोव्हेंबर रोजी ५ हजार ५४४, २८ नोव्हेंबरला ५ हजार ९६५ आणि २७ नोव्हेंबरला ६ हजार ४०६ इतके रुग्ण आढळले होते. 
 
राज्यात बाधितांची एकूण संख्या १८ लाख २३ हजार ८९६ झाली असून मृतांची संख्या ४७ हजार १५१ वर पोहोचली आहे. राज्यात ९० हजार ५५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी ४ हजार १९६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
मुंबई १९, नवी मुंबई ४, कल्याण डोंबिवली २, भिवंडी निजामपूर १, नाशिक ४, नाशिक मनपा ३, मालेगाव १, जळगाव ३, जळगाव मनपा ३, पुणे २, पुणे मनपा १, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सातारा १, रत्नागिरी २, जालना १, हिंगोली २, उस्मानाबाद १, बीड ३, बुलढाणा १, नागपूर ३, नागपूर मनपा ४, चंद्रपूर ७, चंद्रपूर मनपा ४ , गडचिरोली १ आणि अन्य राज्य व देशातील एक रुग्णांचा समावेश आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहताय? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जुनी अट बदलली, नवी अट काय?

थाई मांगूर म्हणजे काय? बंदी असलेला मासा तुमच्या ताटात तर नाही ना? नागपुरात ३६ टन मासे नष्ट का करण्यात आले?

शिंदेंची मोठी योजना, केरळच्या १४ जिल्ह्यांमध्ये शिवसेना मजबूत करण्याची तयारी; शायना एन.सी. केरळमध्ये दाखल झाल्या

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; निवृत्त पोलीस कुत्र्यांसाठी आता सरकार उचलणार आयुष्यभराचा खर्च

LIVE: गोंदियामध्ये मलेरियाचे १२६ रुग्ण आढळले

पुढील लेख
Show comments