बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (08:39 IST)

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, ६४०६ नवे रूग्ण सापडले

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे ६४०६ नवे रूग्ण सापडले आहेत. तर राज्यात ६५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४८१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण १६६८५३८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५७% इतका आहे. 
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १०५४७३३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८०२३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५२८६९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६६३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १४१८५ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५५३३ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा १८८८७ इतका आहे.