बुधवार, 7 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:41 IST)

राज्यात 945 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 945 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 997 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 65 हजार 893 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
 
राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.सध्या राज्यात 1,07,033 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.