शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोलापूर , गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:56 IST)

शिवभोजन थाळीने गाठला लाखाचा टप्पा

जिल्ह्यात 1 लाख 18 हजार 74 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतला आहे. लॉकडाउनच कालावधीत जिल्ह्यात 80 हजार 653 गरजू आणि गरीब लोकांना या थाळीचा आधार मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिदिं शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात 26 शिवभोजन केंद्रे आहेत. त्यापैकी पाच शहरात तर 21 केंद्रे ग्रामण भागात आहेत. जिल्ह्यासाठी दररोज 3500 थाळींचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत शिवभोजन केंद्रांमधून गरीब व गरजू लोकांना पुरविण्यात आलेल्या एकूण थाळींची संख्या 1 लाख 18 हजार 074 आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य, गॅस इत्यादीचा निति पुरवठा सुरू आहे. खुाल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अन्नधान्य पुरेसे आहे. जिल्हा आणि शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण सुरू आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 20 वितरकांद्वारे शहरात वितरण सुरु आहे..