मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (20:00 IST)

धक्कादायक ! पिंपरीत नायजेरियातून आलेल्या कुटूंबातील 4 जणांना ओमीक्रॉन ची लागण

पिंपरीत नायजेरियातून काही दिवसापूर्वी मूळ भारतीय वंशाची एक महिला आपल्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटायला आला होती. ता तिघींची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 13 जणांची तपासणी केल्यावर त्यापैकी 6 जणांना कोरोनाच्या नव्या ओमीक्रॉन  व्हेरियंटची लागण लागल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात महिलेचा भाऊ, भावाच्या दोन मुली ज्यांचे वय दीड वर्ष आणि सात वर्ष आहे. अशा सहा जणांना ओमिक्रोन ची बाधा लागली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील अजून 4 जणांना ओमीक्रॉन ची लागण लागण्याचे  महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळवले आहे. त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.  महाराष्ट्रात ओमिक्रॉन या नवीन प्रकारातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात या व्हेरियंट ची लागण झालेले आणखी 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 17 झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे की मुंबईत ओमिक्रॉनचे 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेतील 4 रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकन व्हेरियंट आढळून आला आहे.