1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
  4. The city today discharged 337 coronaviruses, registering 320 new patients

शहरात आज 337 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 320 नवीन रुग्णांची नोंद

The city today discharged 337 coronaviruses
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 320 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 337 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
शहरातील 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 298 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 59 हजार 700 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
 
सध्या 1 हजार 347 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 287 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 60 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
 
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 53 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 453 आहेत. आज दिवसभरात 6 हजार 135 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 7 लाख 35 हजार 700 जणांनी लस घेतली आहे.
पुढील लेख
लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी