रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (08:18 IST)

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर

54,022 नवे रुग्ण ; 37,386 जणांना डिस्चार्ज
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. शुक्रवारी  राज्यात 54 हजार 022 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 37 हजार 386 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 लाख 96 हजार 758 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 42 लाख 65 हजार 326 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 54 हजार 788 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
तर  898 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 74 हजार 413 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 85.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट देशाच्या रिकव्हरी रेट पेक्षा अधिक आहे.
 
सध्या राज्यात 38 लाख 41 हजार 431 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 28 हजार 860 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख 30 हजार 580 नमूने तपासण्यात आले आहेत.