1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (08:14 IST)

राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट

महाराष्ट्रात आज (सोमवारी) नव्यानं वाढणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. राज्यात आज 7 हजार 603 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 15 हजार 277 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.15 टक्के एवढा झाला आहे.

आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 65 हजार 402 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 27 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून, सध्या 1 लाख 08 हजार 343 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
 
महाराष्ट्रात आज 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 26 हजार 024 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 41 लाख 86 हजार 449 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 476 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 654 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.