गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (12:18 IST)

महाराष्ट्रात कोविड 19 चे नवीन 8535 रुग्ण आढळले,156 लोक मृत्यूमुखी

रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 8535 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर या साथीच्या आजारामुळे 156 रुग्णांनी आपला जीव गमावला. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार या काळात 6013 रुग्ण या आजारावर बरे झाले. विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की संसर्ग होण्याच्या नवीन घटनांनंतर राज्यात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या वाढून 61,57,799 झाली आहे, तर मृतांचा आकडा 125878 पर्यंत पोहोचला आहे. 
 
राज्यात आतापर्यंत एकूण 5912479 लोक संसर्गमुक्त झाले आहेत तर उपचाराधीन रूग्णांची संख्या 116165 वर गेली आहे. महाराष्ट्रातील रिकव्हरी  दर आता 96.02 टक्के आहे तर मृत्यू दर 2.04टक्के आहे. रविवारी मुंबईत संक्रमणाची 558 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर या काळात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला. 210411 नवीन नमुन्यांची चाचणी घेऊन महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तपासणी करण्यात आलेल्या एकूण नमुन्यांची संख्या 44010550 वर पोहोचली आहे. 
 
त्याचबरोबर गेल्या 24 तासात राज्यातील मराठवाडा प्रदेशात कोरोना विषाणूची (कोविड -19) साथीच्या आजाराच्या 330 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. या भागातील 8 जिल्ह्यांपैकी औरंगाबाद जिल्हा सर्वाधिक बाधित झाला .इथे 38 नवीन घटना घडल्या आणि पाच लोकांचा मृत्यू झाला. 
 
 
यानंतर बीडमध्ये 188 नवीन प्रकरणे आणि एक मृत्यूची नोंद झाली आहे. उस्मानाबादमध्ये  58,लातूरमध्ये 19 आणि जालना येथे 11 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली. त्याचवेळी परभणी येथे 9, नांदेडमध्ये दोन रुग्ण आढळले.