शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 12 जुलै 2021 (09:35 IST)

मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अति वृष्टीचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात 12 ते 15 जुलै दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
रविवारी पावसाने मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात दमदार हजेरी लावली आहे.या मुळे मुंबईकरांना उकाड्या पासून सुटका झाली आहे.
 
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,12 जुलै रोजी कोकण आणि गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
काही ठिकाणी अतिवृष्टी होईल.मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे.तसेच 13,14 जुलै रोजी विदर्भ, कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र,घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.