सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (10:50 IST)

मुंबई महानगरपालिकाचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचं निधन

मुंबई महानगरपालिकाचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचे आज सकाळी पहाटे भायखळ्यातील मसिना येथे निधन झाले.ते 79 वर्षाचे होते.बुधवारी त्यांच्या राहत्या घरी पूजा करत असताना त्यांच्या लुंगीने पेट घेतला आणि त्यात ते गंभीररित्या भाजले.त्यांना तातडीने मसिना रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल केले.पहिल्या दिवशी त्यांची प्रकृती स्थिर होती नंतर प्रकृती खालावत गेली असल्याचे वृत्त त्यांच्या मुलाने दिले आहे.या आगीत ते सुमारे 80 ते 90 टक्के भाजले होते.त्यांच्या वर रुग्णालायात उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.
 
वृत्तानुसार दररोज प्रमाणे ते घरात पूजा करत असताना त्यांच्या लुंगीने पेट घेतला आणि या मध्ये ते भाजले.त्यांच्या घरात त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलं, सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.