शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (15:10 IST)

दोन डोस घेतलेले आहेत त्यांना भविष्यात निर्बंधातून काही सवलती देणार

मुंबईकरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधातून सवलत मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना निर्बंधांमध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संकेत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
 
मुंबईत लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत त्यांना भविष्यात निर्बंधातून काही सवलती देण्याचा विचार होवू शकतो.दुकाने,शासकीय,निमशासकीय किंवा खासगी कार्यालयात उपस्थिती वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. याचा निर्णय आठ दिवसांत होईल. यात लोकलचा विचार केला जात नाही आहे. कारण आजूबाजूच्या शहरांमधील स्थितीचा विचार करावा लागेल व याचा निर्णय राज्य स्तरावर होईल. एक दोन दिवसांत लससाठा उपलब्ध होईल, अशी माहिती काकणी यांनी दिली.