मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (08:53 IST)

धक्कादायक !दोन वर्षाच्या चिमुकलीसह महिलेने आत्महत्या केली

मध्य रेलवेच्या आसनगाव स्थानकाजवळ एका महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह रेलवे समोर येऊन उडी मारून आत्महत्या करण्याची दुर्देवी घटना घडली आहे 
 
ही दुर्देवी घटना शनिवारी घडल्याचे वृत्त मिळाले आहे रात्री 8:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे हेमांगी रेपे वय वर्ष 28 आणि संस्कृती रेपे वय वर्ष 2 अशा या मयतांची नावे आहेत.या दोघी उल्हासनगर येथील रहिवासी असल्याचे समजले आहे.
 
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून शनिवारी रात्री 8:30 च्या सुमारास एका एक्स्प्रेस समोर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.या एक्स्प्रेस ची धडक बसून दोघींचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.