गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (17:28 IST)

कोरोनाच्या आढाव्या बैठकीत पंतप्रधानांनी नाराजी दर्शविली

नवी दिल्ली. देशातील कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमध्ये कोविडच्या संदर्भात उच्चस्तरीय बैठकीत केंद्रातून पाठविलेल्या व्हेंटिलेटरच्या वापराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीत गावांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मोदी म्हणाले की खेड्यांमध्ये घरोघरी जाऊन चाचण्या केल्या पाहिजेत तसेच तेथे ऑक्सिजनचा पुरवठा देखील झाला पाहिजे. ते म्हणाले की, आशा कार्यकर्ता समवेत कोविडचा लढा तीव्र करा. तसेच केंद्राकडून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये होणाऱ्या खराबीची चौकशी झाली पाहिजे. असं ही ते म्हणाले. मात्र, व्हेंटिलेटर न वापरल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीतअधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना देशातील कोविडशी संबंधित सद्यस्थितीची माहिती दिली. मार्चच्या सुरूवातीला दर आठवड्याला सुमारे 50 लाख चाचण्या केल्या जात होत्या,आता दर आठवड्याला चाचण्या 1.3 कोटी झाल्या.असे पंतप्रधानांना सांगण्यात आले. वाढती सकारात्मकता दर आणि वाढत्या रिकव्हरी दर बद्दलही मोदींना माहिती देण्यात आली.
बैठकीत अधिका्यांनी कोविडची राज्य व जिल्हा पातळीवरील स्थिती, चाचणी, ऑक्सिजनची उपलब्धता, आरोग्य पायाभूत सुविधा, लसीकरण रोडमॅप याविषयी सविस्तर सादरीकरण केले.
शनिवारी देशात एका दिवसात 3,26,098 लोकांमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये 2,43,72,907 पर्यंत वाढ झाली आहे. तर  3,890 रुग्ण मरण पावल्यावर मृतांचा आकडा वाढून 2,66,207 झाला आहे.
आकडेवारीनुसार, आजारातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 2,04,32,898 झाली आहे, तर संसर्गातून मृत्यूची संख्या 1.09 टक्के नोंदली गेली आहे.