बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (22:21 IST)

कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करावा

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टिका म्हणजेच लसीकरण या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत दिल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात झालेल्या या बैठकीत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 74 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. जिल्ह्याला व्हेंटिलेटर, आरोग्य विषयक सुविधा आणि आणखी लसी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं.
 
आरोग्य विभागाला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने गतीनं कार्यवाही करण्यात येत आहे, जिल्हा स्तरावर देखील जलद कार्यवाही करावी, अशी सूचनाही टोपे यांनी केली.