1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (07:08 IST)

राज्यात २,७३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, मृत्यूदर २.५२ टक्के

The state recorded 2
राज्यात गुरुवारी २,७३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,३६,००२ झाली आहे. राज्यात आता ३४,८६२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,२१५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५, अहमदनगर ३, पुणे ११, यवतमाळ ६, वर्धा ३ आणि अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ४६ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू पुणे ७, यवतमाळ ५, अमरावती २ आणि वर्धा १ असे आहेत.
 
तर ५,३३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,४८,६७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,४८,२१,५६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३६,००२ (१३.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७८,६७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.