शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (07:31 IST)

राज्यात ६ हजार २१८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली

राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यात ६ हजार २१८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख १२ हजार ३१२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
दिवसभरात ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ५ हजार ८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५८ लाख ६० हजार ९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख १२ हजार ३१२ (१३.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार २८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यातील ५३ हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.