1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
  4. This district is corona free while less than 10 corona are affected in these districts

हा जिल्हा कोरोनामुक्त तर या जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी कोरोना बाधित

कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे. राज्यातील कोरोना सद्यस्थिती  नंदूरबार जिल्हयात एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही. राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे. राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.
 
 सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग. (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.
 
१८ ऑगस्ट २०२१ पर्यंतची आकडेवारी
आजपर्यंत बाधित झालेले एकूण रुग्ण – ६४ लाख १ हजार २१३.
 बरे झालेले रुग्ण – ६२ लाख १ हजार १६८.
 एकूण मृत्यू – १ लाख ३५ हजार २५५
 सक्रिय रुग्ण संख्या – ६१ हजार ३०६.
रुग्ण बरे होण्याचा दर – ९६.८७ टक्के.
पुढील लेख
बीडीडी चाळकऱ्यांसाठी कॅबिनेटचा ‘मोठा निर्णय’, सरकारच्या २२० कोटींवर पाणी