शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: ठाणे , मंगळवार, 16 जून 2020 (17:04 IST)

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या बहिणीचा कोरोनाने मृत्यू

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची मोठी बहीण हमीदा हिचे नुकतेच निधन झाले. ती कोरोनाग्रस्त होती. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या महिन्यातच त्याची धाकटी बहीण फहमीदा शेख हिचे निधन झाले होते.
 
धाकट्या बहिणीचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला होता. तिचीही कोरोना चाचणी घेतली होती. फहमीदा ही मिरारोड येथे आपल्या कुटुंबासह राहत होती. तिचे पती आरिफ शेख हे व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आहेत.