शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (11:44 IST)

करोनाविरुद्ध लढ्यासाठी ‘या’ उद्योगपतीने दिले 100 कोटी

देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढत असताना आता भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आणि उद्योजकांनी मदतीची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. 
 
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मदतीचे घोषणा केल्यानंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी देखील मदतीचा हात पुढे वाढवला आहे. अनिल अग्रवाल यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली आहे. तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी करोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
 
करोना संकटावर मदतीचा हात पुढे करण्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे पहिले उद्योगपती ठरले आङेत. त्यांनी ट्विटवरुन केलेल्या घोषणेमध्ये आपला संपूर्ण पगार करोनाविरुद्ध लढण्यासाठीच्या निधीला देणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही असं करण्यास सांगितलं आहे.