मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (18:17 IST)

कुठून आला करोना व्हायरस, WHO ने सांगितले

चीनच्या वुहान शहरातील विषाणूशास्त्र प्रयोगशाळा हे करोनाचे उगमस्थान असून तेथून त्याचा जगभर फैलाव झाला असा दावा अमेरिकेचे अध्यी डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत मात्र आता हा दावा जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळला आहे.
 
डब्यूएचओच्या आपत्कालीन परिस्थितीचे प्रमुख डॉ रायन म्हणाले की करोना व्हायरसच्या जनुकीय क्रमाचा अभ्यास केलेल्या वैज्ञानिकांशी आम्ही चर्चा केली आहे. त्यानुसार हा व्हायरस नैसर्गिक उत्पन्न झाला असल्याचा विश्वास आहे. तसेच करोनाचा नैसर्गिक स्त्रोताचा शोध लागणे आवश्यक असनू त्याबद्दल अधिक माहीती मिळू शकेल यामुळे भविष्यातील अशा प्रकाराचा धोका टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.