शुभ मंगल सावधान, लग्नात ५० व्यक्तीना परवानगी
लॉकडाउन वाढवताना केंद्रानं अनेक गोष्टींमध्ये सूट दिली आहे. यामध्ये रखडलेल्या विवाहसोहळ्यांचाही विचार करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात लग्नांसाठी उत्सुक असणाऱ्यांना सशर्त सूट देण्यात आली आहे. यामधील महत्वाची अट म्हणजे वर आणि वधू या दोन्ही कुटुंबाकडून एकूण ५० व्यक्तींनाच विवाहाला हजेरी लावता येईल. तसेच सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क बंधनकारक आहे. दुसरीकडे, अंत्यविधीसाठी मात्र अगोदरप्रमाणेच केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.