शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : मंगळवार, 25 एप्रिल 2023 (20:20 IST)

महाराष्ट्रीन लग्नात आवर्जून लागणारी मुंडावळ आणि त्यातील विविध प्रकार

mundavalaya
महाराष्ट्रीन लग्नातील सर्व विधी सुंदर असतात. लग्नाचा दिवस वधू-वर आणि कुटुंबीयांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा असतो. लग्नाची लगबग आणि तयारी करता करता कधी लग्नाचा दिवस उजाडतो हे कळत नाही. अगदी लग्नाच्या दिवसांपर्यंत काही ना काही छोटी खरेदी प्रत्येक घरात सुरूच असते. महाराष्ट्रीन लग्नात आवर्जून लागणारी आणि वधू-वराचं सौंदर्य वाढवणारी गोष्ट म्हणजे मुंडावळ किंवा मुंडावळी.

महाराष्ट्रीन लग्नात मस्ट असणार्‍या मुंडावळ्यांमधील भरपूर प्रकार आता बाजारात मिळतात. महाराष्ट्रातील काही भागात मुंडावळ्यांऐवजी बाशिंगही बांधलं जातं. कारण मुंडावळ्यांशिवाय वधू-वरांचा लूक अपूर्ण आहे. लग्नाच्या विधींमध्ये मुंडावळ बांधण्याचा खास विधी असतो. लग्नाआधी ग्रहमखालाही वधू आणि वराला मुंडावळ बांधल्या जातात. महाराष्ट्रातील काही ठिकाणी हळदीच्या वेळी मुंडावळ बांधण्यात येतात. पाहूा मुंडावळ्यांचे विविध प्रकार.
mundavalaya मुंडावळ्यांचे विविध प्रकार
पारंपरिक फुल मुंडावळ्या 
लग्नाविधींमध्ये हमखास फुलांच्या मुंडावळी किंवा मुंडावळ वर-वधूंना बांधल्या जातात. यामध्येही आजकाल भरपूर व्हरायटी पाहायला मिळते. ज्यामध्ये मोगरा, निशिगंधा, झेंडू आणि अष्टर फुलंही वापरली जातात. सध्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या मुंडावळ्यांना जास्त मागणी आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी रूईच्या  फुलांच्या मुंडावळ्याही बांधल्या जातात.
मोत्याच्या मुंडावळ्या 
मोती या प्रकारात मिळणार्‍या मुंडावळ्यांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे अगदी 20 रूपयांच्या साध्या मुंडावळ्यांपासून ते अगदी ठुशीसारख्या डिझाईनच्या हजार रूपयांर्पंतच्या मुंडावळ्याही मिळतात.
सोन्या-चांदीच्या मुंडावळ्या
गेल्या 5-6 वर्षांपासून लग्नात चांदीच्या मोत्यांच्या सोन्याचं पाणी चढवलेल्या मुंडावळ्या किंवा 1 ग्रॅम सोनच्या मुंडावळ्याही बर्‍याच लग्नात तुम्ही वधूवरांना घातलेल्या पाहिल्या असतील.
बाशिंग
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि काही इतर भागात मुंडावळ्यांऐवजी बाशिंग बांधलं जातं. आजकाल बाशिंगमध्ये आता भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे.
डिझायनर मुंडावळ्या 
मुंडावळ्यांमध्येही आता विविध डिझाईन्सच्या डिझायनर मुंडावळ्या तुम्हाला बाजारात मिळतात. तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईज्ड मुंडावळ्याही  बनवून घेऊ शकता.