शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2019 (15:26 IST)

'बलिदान बॅज' वाद: धोनीला पाठिंबा देणार BCCI, नाकारला ICC चा आक्षेप

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्या विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवर भारतीय सेनेच्या 'बलिदान बॅज' बद्दल आयसीसीच्या आक्षेपाविषयी वाद वाढला आहे. Cricket World Cup 2019 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात विकेटकीपिंग दरम्यान धोनीने जे ग्लोव्ह्ज घातले होते, त्यावर सेनेचा 'बलिदान बॅज' बनला होता. यावर ICC ने BCCI ला धोनीला ग्लोव्ह्जवरून मिलिटरीशी संबंधित चिन्ह काढून टाकण्यास सांगितले पाहिजे असे म्हटले आहे. तथापि, BCCI ने या प्रकरणात महेंद्रसिंग धोनीला पाठिंबा दिला आहे आणि त्याचा समर्थन देखील केला आहे. 
 
* विनोद रायने ICC ला परवानगी देण्यास पत्र लिहिले
 
सर्वोच्च न्यायालयद्वारे गठित BCCI च्या प्रशासकीय समितीचे (सीओए) अध्यक्ष विनोद राय म्हणाले, 'आम्ही आपल्या खेळाडूंसह उभे आहोत. धोनीच्या ग्लोव्ह्जवर असलेला हा चिन्ह कोणत्याही धर्माचे प्रतीक किंवा व्यावसायिक देखील नाही आहे.' ते म्हणाले की जेथे आधी पासून परवानगी घेण्याची गोष्ट आहे तर त्यासाठी आम्ही ICC ला लिहिले आहे की त्यांनी धोनीला या ग्लोव्ह्ज वापरण्यास परवानगी द्यावी. या मुद्द्यावर देशातील अनेक खेळाडूंनी देखील धोनीचं समर्थन केलं आहे.