सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By

ठरली टीमची भगवी जर्सी

भारतीय संघ इंग्लंडसोबत होणाऱ्या सामन्यात भगवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. खुद्द बीसीसीआयने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे आणि नव्या जर्सीचा फोटोही शेअर केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या जर्सीची चर्चा होती. अखेर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या जर्सीत खेळणार असल्याचं निश्चित झालंय.

भारतीय संघ भगव्या जर्सीत खेळणार असल्याची चर्चा रंगताच याला राजकीय रंगही देण्यात आला. तर काहींनी याचं समर्थनही केलं. भारतीय संघाची नवी जर्सी भगव्या रंगात आहे. या जर्सीच्या मागील बाजूस पूर्णपणे भगवा रंग आहे. पुढील बाजूस डार्क निळा रंग आहे, तर हाताला भगवा रंग आहे.