शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2019 (16:27 IST)

विश्वचषक क्रिकेट : मक्सवेल कांगारूंचा आधारस्तंभ

आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा कांगारूचा प्रमुख आधारस्तंभ खेळाडू राहील, असे पॅट कमिन्सने सांगितले.
 
वेगवान कमिन्सने मॅक्सवेल स्तुती केली. मॅक्सवेल याची या स्पर्धेत प्रमुख भूमिका राहील. तो बॅट आणि बॉलवरील स्टार खेळाडू आहे. सहाव्यावेळी विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे. परंतु ऑस्ट्रेलिाला मॅक्सवेलवर अवलंबून राहावे लागेल.
 
ऑस्ट्रेलिया सध्याच्या विश्वविजेता संघ आहे. 2015 साली त्यांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा पाचव्यावेळी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक मोहिमीची चांगली तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंका आणि इंग्लंड संघांना सराव सामन्यात पराभूत केले आहे.
 
ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वासाच्या लाटेवर स्वार झाला आहे. ऑस्ट्रेलियाने यावर्षी भारत आणि पाकिस्तानविरूध्दच्या एकदिवसीय  मालिका जिंकल्या आहेत. मालिका विजयासह ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5-0 असा पराभव केला. या यशात मॅक्सवेलची महत्त्वाची भूमिका आहे. त्याने  
पाकिस्तानविरूध्द तीन अर्धशतके ठोकली आहेत.
 
कमिन्स हा ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधार आहे. मॅक्सवेल विश्वचषक स्पर्धेत आपला फॉर्म कायम ठेवेल, अशी आशा आहे. गेली काही महिने त्याने प्रभावी फलंदाजी करून काही सामने ऑस्ट्रेलिच्या बाजूने फिरवून दिले आहेत. त्यानंतर तो दहा षटके गोलंदाजीचा कोठाही पूर्ण करतो, असे कमिन्स म्हणाला.
 
तो उत्तम क्षेत्ररक्षक असून फलंदाजांना धावचीत करण्यात तरबेज आहे तसेच झेलही उत्तम तर्‍हेने टिपतो. खर्‍या अर्थाने तो अष्टपैलू आहे, असे कमिन्स म्हणाला. मॅक्सवेल  हा आमचा सहावा गोलंदाज असेल. तो फॉर्ममध्ये आहे.
 
गेली 30 ते 40 वर्षांत आम्ही विश्वचषक स्पर्धेत बरच वेळा यश मिळविले आहे. यावेळी आम्हाला विजेतेपद मिळविण्याचा विश्वास आहे, असेही तो म्हणाला.
 
सराव सामन्यात श्रीलंकेविरूध्द ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला सहज नमविले. आम्ही गेली काही महिने सातत्याने क्रिकेट खेळले आहे, असे कमिन्स म्हणाला.