गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. ओळख क्रिकेटपटूंची
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:34 IST)

Hardik Pandya: हार्दिक पांड्या पहिल्यांदा सासू-सासऱ्यांना भेटला,शेअर केला व्हिडीओ

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी (25 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात अंतिम भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला.या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली.
 
 आता हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासूला भेटताना दिसत आहे. व्हिडिओ आणि फोन कॉलनंतर हार्दिकने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले: व्यक्तिशः भेटलो, नेट्सच्या (नताशा) कुटुंबाला  पहिल्यांदा भेटणे खूप छान वाटले. अशा क्षणांसाठी कृतज्ञ. 
 
व्हिडीओमध्ये हार्दिकची सासू रॅडमिला स्टॅनकोविक म्हणते, मला माहित होते की तो नक्कीच येणार आहे.मी खूप आनंदी आहे. मला हार्दिकला भेटू  दे.'नंतर  हार्दिक गमतीने आपल्या सासूला सांगतो की, तिचा नवरा शर्टशिवाय आधी बसला आहे.  यावर हार्दिकच्या सासूने सांगितले की, त्याने आता पर्यंत  शर्ट घातला होता . यानंतर हार्दिकने त्याचे सासरे गोरान स्टॅनकोविक यांचीही भेट घेतली हार्दिकने सासरच्या मंडळींना शर्टबाबत प्रश्न विचारला. 
नताशा स्टॅनकोविक ही मूळची सर्बियाची असून तिने सत्याग्रह या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. तिला खरी ओळख बॉलीवूड गायक बादशाहच्या 'डीजे वाले बाबू...' या सुपरहिट गाण्याने मिळाली. नताशाने बिग बॉस आणि नच बलिए यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. 
नताशा आणि हार्दिक यांनी 2020 च्या सुरुवातीला त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली. त्यानंतर नताशाने जुलै 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. हार्दिक आणि नताशायांनी त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे.