जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं। गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥ गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥