रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,
त्याचा लागे ना अंत -२
स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त ।।धृ.।।
दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात,
अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात,
दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ।।१।।
हो त्याचा लागे ना अंत....-२
भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत,
रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात,
कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ।।२।।
हो त्याचा लागे ना अंत..... -२
श्वानांची फौज होती त्यांच्या संगत,
श्वानांना भाकर टाकत होते भगवंत,
बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ।।३।।
हो त्याचा लागे ना अंत....... -२
भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत,
खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात,
गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा, ठेवा ध्यानात ।।४।।
हो त्याचा लागे ना अंत........ -२